देवळाली प्रवरातून उद्या मंगळवारी राजयोगी श्री.समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातून उद्या मंगळवारी राजयोगी श्री.समर्थ त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान

  देवळाली प्रवरा (वेबटीम)  श्री त्र्यंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्था देवळाली प्रवरा,ता.राहुरी यांच्या वतीने, देवळाली प्रवरा शहराचे आर...

 देवळाली प्रवरा (वेबटीम)



 श्री त्र्यंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्था देवळाली प्रवरा,ता.राहुरी यांच्या वतीने, देवळाली प्रवरा शहराचे आराध्यदैवत राजयोगी श्री समर्थ  त्र्यंबकराज  स्वामी यांचा श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते तिर्थक्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा समस्त शहरवासीयांच्या प्रेरणेने व भक्तपरिवार यांच्या सहकार्याने ह.भ.प.नामदेव महाराज शास्री याच्या अधिपत्याखाली आणि ह.भ.प.बाबामहाराज मोरे,ह.भ.प.सुभाष महाराज विधाटे,ह.भ.प.भगवान महाराज मोरे ( देहूकर ) ह.भ.प.सोमनाथ महाराज माने, ह.भ.प.किशोर महाराज निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. २ जूलै रोजी सकाळी १० वाजता सत्यजित कदम व सौ.प्रियाताई कदम यांचे हस्ते पालखी पूजन होऊन दिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान होणार आहे.

     बुधवार दि.३ जूलै रोजी सकाळी ८ वाजता माजी खासदार लोकनेते बापूसाहेब तनपुरे व डॉ. सौ.उषाताई तनपूरे यांच्या हस्ते राहुरी शहरात पालखी पूजन होऊन दिंडी मार्गस्थ होणार आहे.



दिंडी सोहळ्या दरम्यान सकाळी ५ ते ६ काकडा व भजन,सकाळी ७ वाजता आरती व पुढील प्रवासात अखंड भजन सेवा सुरु,सकाळी ११ ते १२ प्रवचन व नंतर भोजन विश्रांती व प्रवास,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, आरती, रात्री ७ ते ८ किर्तन व नंतर भोजन अशा प्रकारे दैनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर येथे दिंडीचे वास्तव्य श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी सेवाश्रम ( भटुंबरे ) पंढरपूर येथे असणार आहे. मंगळवार दि.१६जूलै रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूर येथे दिंडी प्रदक्षिणा होईल व १८ जूलै रोजी सकाळी महाप्रसादाचे वाटप होऊन दिंडीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.  दिंडी सोहळ्याची सांगता देवळाली प्रवरा येथिल नियोजित श्री त्र्यंबकराज स्वामी वारकरी शिक्षण संस्था तथा धर्म संस्कार केंद्रा शेजारी .श्रीरामपूर रस्ता, देवळाली प्रवरा येथे सोमवार दि.२२ जूलै रोजी सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प.महंत उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तन होऊन महाप्रसादाने होणार आहे. यावेळी संतपूजन श्री व सौ.शिलाताई सोन्याबापू जाधव या उभयतांच्या हस्ते होणार आहे. 

दिंडीसोहळाराहुरी,देहरे,नगर,दरेवाडी,साकत,मांदळी,पाटेगांव,करमाळा,पांगारे,फुटजळगाव,टेभुर्णी,अरण व करंब मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १५ जूलै रोजी पोहचणार आहे.श्रीक्षेत्र पंढरपूर येथे करजगाव ता.राहुरी येथिल सोसायटीचे माजी अध्यक्ष,प्रगतीशील शेतकरी नानासाहेब श्रीरंग कोतकर यांच्या वतीने दिंडीसाठी पंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती मिराताई विखे,अशोक खुरुद,संदिप उंडे,अमोल गाडे,संजय कर्डक,विकास येवले,संजय कदम,कांता कदम,बाळासाहेब कदम,डॉ. प्रसाद ढुस,प्रकाश गायकवाड, रंजित राजळे,रेवन्नाथ लहारे,ह.भ.प.सुभाष पठारे,एकनाथ राऊत,गणेश सांबारे आदीनी दिंडी सोहळा अन्नदानाची व्यवस्था केली आहे.तर सत्यजित कदम,प्रकाश संसारे,सौ.शर्मिला संजय मुसळे,दिनेश अग्रवाल,काळूराम कोठारी,उदयभान परदेशी यांनी दिंडी आश्रयाची व्यवस्था केली आहे.


 दिंडी सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी सुरेश वाबळे,फ्रांसिस संसारे,विकास नवाळे,रविभैय्या गडाख,नितीन नागपूरे,देवळाली प्रवरा सोसायटी अध्यक्ष,उपाध्यक्ष,   संचालक मंडळ व कर्मचारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी व सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. संस्थापक ह.भ.प. सिताराम ढुस, आद्यप्रवर्तक  यांचे अनमोल मार्गदर्शन दिंडी सोहळ्यास लाभले असल्याची माहिती  सचिन ढुस,बाबा सांबारे, सोन्याबापू जाधव, विठ्ठल टिक्कल, बाबासाहेब चोथे,  सौ.सुशिला कदम,राजेंद्र ढुस,सौ.शोभा वरखडे व मयूर सप्रे आदीसह श्री त्र्यंबकराज स्वामी शिक्षण व वारकरी संस्था देवळाली प्रवरा ,व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली.

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत