राहुरी(वेबटीम) सध्या अनेक व्हाट्सअप गृपवर पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू दिले नाही असा आशयाचा व्हिडीओ व्हायरल होत असल...
राहुरी(वेबटीम)
सध्या अनेक व्हाट्सअप गृपवर पंढरपूरला निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू दिले नाही असा आशयाचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सदर व्हिडीओ जुना असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी म्हंटले की, काल दिनांक 04/07/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पंढरपूर येथे निघालेल्या दिंडीतील भजनी मंडळींना भजन करू दिले नाही अशा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. सदर बाब ही संपूर्णतः अफवा आहे. सदर व्हिडिओची शहानिशा केली असता सदरचा व्हिडिओ हा सन 2023 मधील नोव्हेंबर महिन्यातील असून त्यावेळी झालेल्या प्रकारावर त्याच वेळी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती.
तसेच ज्या ज्या व्हाट्सअप ग्रुप वर सदरचा जुना व्हिडिओ खोटी अफवा टाकून पसरवण्यात आला होता.त्या ग्रुपच्या एडमिन व व्हिडिओ सेंड करणारा व्यक्ती यांना समज देऊन सदरचा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांना तसेच वारकरी बंधू भगिनी सदरचा व्हिडिओ हा जुना असल्याने कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत