श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरातील स्नेहमाला डान्स अकॅडमी व साई सोशल फाउंडेशनच्यावतीने आज रविवार ७ जुलै रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत ...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर शहरातील स्नेहमाला डान्स अकॅडमी व साई सोशल फाउंडेशनच्यावतीने आज रविवार ७ जुलै रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील खा.गोविंदराव आदीक सभागृहात ' नाच ग घुमा' महिला व मुलींसाठी सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलींच्या ५ ते १२ वर्षे वयोगट, विवाहित महिला वयोगट व बैचलर वयोगटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मीनाताई जगधने, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई सोशल फाउंडेशनचे संस्थापक हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी सभापती बाबासाहेब दिघे, बाजार समिती सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर आदींच्या उपस्थित होणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्यने रसिक व स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नीती हेमंत ओगले, दीपाली करण ससाणे, विनोद वाघमारे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत