देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्यजित कदम यांनी ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सत्यजित कदम यांनी शनिवार 12 जुलै रोजी पंढरपूर आषाढी एकादशी यात्रा वारी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील पायी पालखी व दिंडी सोहळ्यातून पायी जाणाऱ्या सर्व भाविक भक्त व वारकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, भारत शेटे, सुधीर टिक्कल, किशोर गडाख, सचिन सरोदे ,शशीकांत खाडे, भिमराज मुसमाडे, नितीन वाळुंज, ओंकार लांडे, कुमार कदम, अभिजीत कदम राजेंद्र पंडित, सूर्यभान गडाख, शेटे मामा, संतोष चव्हाण, संतोष हारदे, सुधीर पठारे, शाम जाधव, निलेश पठारे, ऋषिकेश चव्हाण, बाबासाहेब शेटे, विजय खांदे, कल्पेश भालसिंग, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब कल्हापुरे, निलेश मुसमाडे, अविनाश कल्हापुरे आदि कार्यकर्ते यावेळी सत्यजित कदम यांच्या बरोबर उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे या ही वर्षी पंढरपूर आषाढी एकादशी यात्रा वारी निमित्त राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखों वारकरी भाविक दिंडी सोहळ्यातून पंढरपूर कडे रवाना झाले आहेत या सर्व दिंडी सोहळ्यांना माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी भेटी दिल्या यामध्ये राहुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या संतकवी महपती महाराज पायी दिंडी सोहळा रथाचे दर्शन घेऊन कवीटगाव ते कंदर अंतर पायी चालले यावेळी हभप तनपूरे महाराज, गागरे महाराज, बाबासाहेब वाळूंज महाराज, कांतापाटील कदम, राजू आण्णा चव्हाण, ज्ञानेश्वर (माऊली) कोळसे आदींसह सर्व वारकरी भाविकांच्या भेटी घेतल्या व सर्वांची आस्थेने विचारपूस केली, आपल्या महाराष्ट्रात शेतकरी बळीराजा सुखावेल असा समाधानकारक पाऊस व्हावा यासाठी पांडुरंगाला साकडे घालावे अशी विनंती सत्यजित कदम यांनी सर्व वारकऱ्यांना केली व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी हभप तनपूरे यांच्या शुभहस्ते श्रीफल देऊन सत्यजित कदम यांचा सत्कार करण्यात आला तर ह्भप बाबासाहेब महाराज वाळूंज यांनी सत्यजित कदम ही आपल्या सोहळ्यास दरवर्षी पाण्याचे टँकर देत असतात याची आठवण करून देऊन सत्यजित कदम यांचे आभार मानले.
राजयोगी त्र्यंबकराज स्वामी महाराज पायी दिंडी सोहळा देवळाली प्रवरा, या सोहळ्यास पावन गणपती मंदिर, टेंभुर्णी येथे भेट देऊन रथाचे दर्शन घेऊन सत्यजित कदम यांनी पावन गणपती मंदिर ते टेंभुर्णी पादुका रथाचे सारथ्य केले, दुपारचे भोजन केले यावेळी चोपदार हभप रावसाहेब महाराज शेटे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला, हभप बाबा महाराज मोरे, नामदेव महाराज शास्त्री, भगवान महाराज मोरे, सोमनाथ महाराज माने, गीतामाई ढसाळ, हिराताई मोकाटे, श्री त्र्यंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप सचिन महाराज ढुस, दिंडी सोहळा अध्यक्ष भाऊसाहेब पाटील कदम, विश्वस्त बाबासाहेब सांबारे, विठ्ठल नाना टिक्कल, सोन्याबापु जाधव, राजेंद्र ढुस आदि यावेळी उपस्थित होते यावेळी सत्यजित कदम यांनी सर्व वारकरी भाविक भक्तांची आस्थेने विचारपूस करून व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तर अध्यक्ष हभप सचिन महाराज ढुस यांनी आभार मानले.
श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज पायी दिंडी सोहळा देवळाली प्रवरा, हभप शिंदे महाराज, दत्ता पाटील कडू, शिवराम कडू, सोपान यांची यावेळी भेट घेतली व सर्व वारकरी भाविक भक्तांची आस्थेने विचारपूस करून व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी दत्ता पाटील कडू यांच्या हस्ते सत्यजित कदम यांचा सत्कार करण्यात आला. यासह वै. गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळा, वळण, श्रीराम पायी दिंडी सोहळा तांभेरे, राजेश्वर पायीदिंडी सोहळा मोकळ-ओहळ, श्री विठ्ठल मंदिर हनुमानवाडी शिलेगाव पायी दिंडी सोहळा, पायी दिंडी सोहळा कासारवाडी, श्री विठ्ठल रुखमिनी पायी दिंडी सोहळा आरडगाव, श्री बूबळेश्वर गहिनिनाथ कानिफनाथ दिंडी सोहळा, कणगर, संत रघुनाथ महाराज उमरीकर ट्रस्ट, घाटशिरस, वैभव संपन्न जागत श्रीकाळभैरवनाथ देवस्थान दिंडी सोहळा, लोहसर अशा राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पायी दिंडी सोहळयांना सत्यजित यांनी भेट देऊन पुढील प्रवासासाठी सर्व वारकरी भक्तांना शुभेच्छा दिल्या.
सत्यजित कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पंढरपूर आषाढी एकादशी यात्रा वारी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंडी सोहळ्यातील वारकरी भक्तांना शुभेच्छापर भेटी देत असतात या भेटी दरम्यान वारीत वारकऱ्याबरोबर तल्लीन होऊन टाळ वाजवत पायी चालणे, नाचून फुगडी व रथाचे सारथ्य करून सत्यजित कदम यांनी पायी वारीचा आनंद घेतला.
यावेळी सत्यजित कदम म्हणाले की श्रीक्षेत्र पंढरपूर वारीत जाण्याचा योग व भाग्य माझ्या पूर्व संचितानुसार मला लाभले एक दिवस वारकऱ्यांच्या व भजनी मंडळाच्या सानिध्यात होतो. अबाल वृद्ध लाखो भावीक परंपरेनुसार पंढरपूरला वारीसाठी जातात. चहापाणी, नाश्ता, महाप्रसाद, शिस्त अनुभवायास मिळाली अध्यात्मिक प्रवचन, कीर्तन सेवेचाही लाभ घेता आला. सर्वसामान्य वारकऱ्या प्रमाणे पालखी सोबत चालण्याचा आनंदही अनुभवयास मिळाला हा योग व संधी वारंवार प्रत्येक वर्षी मिळावी हीच पंढरीच्या पांडुरंगाची चरणी प्रार्थना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत