श्री.क्षेत्र ताहाराबाद येथे उद्या सोमवारपासून पांडुरंग उत्सव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्री.क्षेत्र ताहाराबाद येथे उद्या सोमवारपासून पांडुरंग उत्सव

राहुरी(वेबटीम) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील प्रतीपंढरी संत कवी महिपती महाराज देवस्थान येथे सोमवार...

राहुरी(वेबटीम)



लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील प्रतीपंढरी संत कवी महिपती महाराज देवस्थान येथे सोमवार दिनांक २९ जुलै ते रविवार ४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत गोपाळ काला श्री पांडुरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी केले आहे.



५ दिवस सुरू राहणाऱ्या पांडुरंग महोत्सवात राज्यभरातील सुमारे ५०० पेक्षा जास्त पायी दिंडी सहभाग नोंदविणार असून  पाच दिवसात राज्यातील पाच लाखाहून अधिक भाविक प्रतीपंढरीत हजेरी लावतात. या निमित्ताने भजन, भारुड, किर्तन व जागर आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोमवारी २९ जुलै रोजी सायंकाळी पंढरपूर येथे पायी गेलेल्या परतीच्या पायी दिंडीचे आगमन व स्वागत, मंगळवार ३० जुलै रोजी गावामध्ये भिक्षा कार्यक्रम, अभिषेक, काकडा आरती, नैवैद्य, हरिपाठ व उत्सवात आलेल्या दिंड्यांचे स्वागत केले जाणार आहे. बुधवार ३१ जुलै रोजी सकाळी ११ वा. नाना महाराज गागरे यांचे हरिकीर्तन, आरती, हरिपाठ, खिचडी प्रसाद वाटप संपन्न होणार आहे. गुरुवार १ ऑगस्ट रोजी रामदास महाराज आहेर, सुधाकर महाराज आहेर, एकनाथ महाराज चत्तर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. शुक्रवार २ ऑगस्ट रोजी बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे फडकऱ्यांचे कीर्तन , दुपारी १२ वा.परिसरातील गायक, वादक, गुणिजन व भजनी मंडळ संगीत भजन, दुपारी ४ वा. संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती गोपाळ काल्याचे हरिकीर्तन दहीहंडी संपन्न होणार आहे. शनिवार ३ ऑगस्ट रोजी छबिना मिरवणूक, पूजा, नवैद्य, आरती व शिळा गोपाळकाला तर रविवार ४ ऑगस्ट रोजी सायं.६ वा.पाऊलघडीचा कार्यक्रम होऊन पांडुरंग महोत्सवाची सांगता होणार आहे.

 तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थाचे विश्वस्त व ताहाराबाद ग्रामस्थांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत