राहुरी(वेबटीम ) शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील जिल...
राहुरी(वेबटीम)
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शन तसेच वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली.
वेशभूषा स्पर्धेत आदित्य दिलीप साळवे याने प्रथम तर जयराज सचिन नालकर व कृतिका संदीप दिवे यांनी द्वितीय तर गुरवेश मारुती नालकर व विद्या नितीन नरोडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तर तन्वी वाळके हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
चिंचविहिरेचे सरपंच सुधीर झांबरे यांच्यातर्फे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच सुधीर झांबरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती नालकर,ग्रामपंचायत सदस्य जयराम गीते, दगडू गीते, संदीप साळवे, सुनील वाळके, अरुण लाहुंडे, बाळासाहेब साळवे ग मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत