श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पूजा चव्हाण यांचा वाढदिवस श्री...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पूजा चव्हाण यांचा वाढदिवस श्रीरामपूर शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
भाजप महिला मोर्चा उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस पूजा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भि. रा.खटोड कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय साबळे, प्राचार्य विद्या कुलकर्णी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. खुरंगे सर, पर्यवेक्षिका सौ.अनिता शिंदे मॅडम सकाळ विभागाचे शिक्षक प्रतिनिधी श्री.शेख सर, श्री. पंकज देशमुख सर, निर्मला लांडगे मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच शहरातील डावखर कन्या विद्यालय येथे गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवानी शहा, रिटा दीदी, मुख्याध्यापिका बोधक मॅडम तसेच शिक्षिका व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. पूजा चव्हाण यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केल्याबद्दल त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत