राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- अल्पावधीत नावालौकिक मिळवलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मोटिव्हेशनल स्पीकर वैभव ढुस यांना नुकताच रोटर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
अल्पावधीत नावालौकिक मिळवलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील मोटिव्हेशनल स्पीकर वैभव ढुस यांना नुकताच रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात त्यांना रोटरी युथ आयकॉन अवॉर्ड मंगळवार २३ जुलै रोजी झालेल्या शिर्डी येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे प्रेसिडेंट निलेश गंगवाल व सेक्रेटरी समीर पठाण आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.
ढुस यांना स्वकर्तृत्वावर मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे चाहत्या वर्गातून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत