राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात असलेल्या स्मशानभूमीचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. त्या ठिकाणी शवदाहिनीची द...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात असलेल्या स्मशानभूमीचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. त्या ठिकाणी शवदाहिनीची दुरुस्ती देखील होती त्याच बरोबर येथील काही डागडूची करण्याचे काम प्रलंबित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष चैतन्य आल्हाट व सहकार्याने देवळाली प्रवरानगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देताच पालिका प्रशासनाकडून प्रसादनगर भागातील स्मशानभूमीचे डागडुजी करण्याचे काम सुरू झाले आहे.
काम सुरू झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांचे आभार मानण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत