कोपरगाव(वेबटीम) एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला, तरी कोपरगाव ...
कोपरगाव(वेबटीम)
एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र ऑगस्ट महिना जवळ आला, तरी कोपरगाव शहराला पिण्यासाठी १२ दिवसा आड पाणी मिळत . धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला व नांदूर मधमेश्वर मधून कॅनलला पाणी सोडले आहे. त्यामुळे नगरपालिकेने ४ दिवसाआड म्हणजे ५ व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा . जेणेकरून महिला भगिनींना नागरिकांना झालेल्या पाण्याच्या त्रास थांबेल. असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हंटले आहे.
गेल्या तीन महिन्यापासून साधारण नागरिकांना गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी येत होते. त्यामुळे नगरपालिकेने शहरात असणारे फिल्टरेशन प्लांट/ पाणी शुद्धीकरण केंद्र यावर लक्ष ठेवून पाणी स्वच्छ नागरिकांना पुरवावे. जेणेकरून पावसाळ्यात होणारे पाण्यामुळे चे आजार हे होणार नाही , याची काळजी ही नगरपालिकेने प्रशासनाने घ्यावी.
नगरपालिकेने पाणी दिवस अचानक पणे वाढवायची वेळ येऊ नये यासाठी लक्ष ठेवून सातत्याने चार दिवस आड कसा पाणीपुरवठा कायमस्वरूपी राहील याची काळजी घ्यावी असे माजी नगराध्यक्ष पाटील यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत