राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वा.राहु...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
नवी मुंबई उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वा.राहुरी फॅक्टरी येथील सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने कँडल पेटवून यशश्री शिंदे हिस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करून कँडल पेटवून हिंदू समाजातील तरुणांनी श्रद्धांजली अर्पण करून यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
यावेळी आशिष सांगळे, योगेश राऊत,सागर भालेराव, रोहित काळे, अनिकेत वाळके ऋषिकेश दिवे ओंकार साळुंके,शुभम विधाटे आदींसह हिंदू बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत