राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या महिन्यांपासून फिरणाऱ्या मनोरुग्ण तरुणास सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांशी संपर्क...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या महिन्यांपासून फिरणाऱ्या मनोरुग्ण तरुणास सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करून त्यांच्या स्वाधीन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील मनोरुग्ण तरुण महेश लक्ष्मण नांद्रे हा गत ६ महिन्यापासून फिरत होता. अनेक नागरिक तसेच पत्रकार आशिष संसारे हे दररोज त्याला चहा व नाश्ता द्यायचे परंतू नाव विचारल तर तो पळ काढत असत. सागर पाळंदे व काही सामाजिक कार्यकर्त्यानी आधार कार्ड व पॅन कार्डवरील पत्ता बघून गुगलची मदत घेऊन शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला गावचे तुकाराम महाराज निंबाळकर यांच्याशी संपर्क केला.
आज मनोरुग्ण महेश याचा भाऊ राजू नांद्रे फातिमा माता चर्चे येथे आला असता धर्मगुरू प्रकाश राऊत, पत्रकार आशिष संसारे, मयुर कदम, सागर पाळंदे, प्रमोद देशमुख, बाळू जगताप, विवेक भोसले, पप्पू बोर्डे,किरण पवार आदींनी मनोरुग्ण महेश यास ताब्यात दिले आहे.
सदर मनोरुग्ण तरुण हा पदवीधर असून मोबाईलच्या अति वापरामुळे डोक्यावर परिणाम झाल्याने ८ महिन्यापासून राहत्या घरातून बेपत्ता होता असे राजू नांद्रे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत