एलसीबीचे पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एलसीबीचे पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची म...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मालमत्तेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 मकासरे यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले की, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे विरोधात अनेक राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या लोकांनी हप्ते घेण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश लंके  यांनी याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री,पो लीस महासंचालक,पोलीस महानिरीक्षक,पोलीस अधीक्षक या सर्वांकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या बद्दल तक्रारी केल्या असून याबाबत अनेक वृत्तपत्रातही बातम्या छापून आलेल्या आहेत.  त्या तक्रारींचा विचार करून सदर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची अहमदनगर येथे नेमणूक झाल्यापासून त्यांनी खरेदी केलेल्या त्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे घेतलेल्या सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी व्हावी तसेच त्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी व्हावी. तसेच ते वापरत असलेल्या मोबाईलचे कॉल, एसएमएस, व्हाट्सऍप कॉल व व्हाट्सऍप मेसेजेसची अहमदनगर येथील नेमणूकी पासून ते आजपर्यंतची सविस्तर माहिती घेवून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मकासरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत