पानेगांव वार्ताहर नेवासे तालुक्यातील करजगांव. ( ता नेवासे) येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कै मच्छिंद्र पाटील...
पानेगांव वार्ताहर
नेवासे तालुक्यातील करजगांव. ( ता नेवासे) येथील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कै मच्छिंद्र पाटील टेमक संस्थेची निवडणूक समिती व्यवस्थापन सन २०२२-२०२७ निवडणूक रविवार दिनांक २१रोजी करजगांव (ता नेवासे )येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडली मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली सायंकाळी ६वा सह्हा निबंधक कार्यालय नेवासे निवडणूक निर्णय अधिकारी एस व्हि ठोंबरे निकाल जाहीर करण्यात आला.सत्ताधारी गटाला १२जागा विरोधी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
सर्वसाधारण मतदार संघ विजयी उमेदवार १) टेमक दिनकर एकनाथ २) टेमक प्रदीप पोपट, ३)माकोणे किसन सुभाष ,४)नांगरे अमोल गोरक्षनाथ, ५)कंक अशोक अर्जुन, ६)देवखिळे मोहन सावळेराम ,७)माकोणे संजय भाऊसाहेब,८) टेमक अशोक साहेबराव (एक जागा विरोधी गट विजयी उमेदवार), अनु जाती जमाती- गायकवाड रमेश चंद्रभान,महिला राखीव- टेमक वैशाली सुर्यकांत,पुराणे तुळसाबाई बापू इतर मागासवर्गीय- पुंड बाबासाहेब हरि भटक्या -मदने विठ्ठल भागवत
विजयी बजरंग सहकार पॅनल नेतृत्व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब माकोणे, उपसरपंच सतिश फुलसौंदर, माजी सरपंच चंद्रकांत टेमक, रितेश टेमक, विद्यमान उपाध्यक्ष आण्णासाहेब कोळेकर संजय कंक आदींनी केले.जय तुळजाभवानी सहकार पॅनल नेतृत्व माजी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक टेमक, अॅड. बीएस टेमक नवनाथ कंक यांनी केले.विजयी उमेदवारांचे अभिनंदन जेष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख पाटील,माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील,युवा नेते उदयन गडाख पाटील यांनी केले.
नेवासे सह्यायक निबंधक अधिकारी देविदास घोडेचोर यांचा मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्हि ठोंबरे, जंगले एस व्हि, जंगले बी पी, यांनी काम पाहिले. सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अशिश शेळके यांचा मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दहिफळे महिला हेडकॉन्स्टेबल आयनर यांनी चोख बंदोबस्त बजावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत