कोपरगाव / प्रतिनिधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी 1 ऑगस्टला कोपरगाव शहरासह तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी, अशा मागणी...
कोपरगाव / प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी 1 ऑगस्टला कोपरगाव शहरासह तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी, अशा मागणीचे निवेदन भाजप अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांनी तहसीलदार, शहर व तालुका पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांना दिले आहे.
सदर निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे, की देशभरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यामध्ये तरुणींसह महिलांचा मोठा सहभाग असतो. मात्र, काही समाज विघटक नशा करुन उत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 1 ऑगस्टला शहरासह तालुक्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवावी. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. अन्यथा समाज आपल्या पद्धतीने दुकाने बंद करतील, यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही अनिल जाधव यांनी दिला आहे. आता प्रशासन यावर काण निर्णय घेते याकडे समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत