पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार नि...
पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर व कडवट समर्थक म्हणून तालुक्यात परिचित असलेले सावरगाव येथील रवींद्र गायखे यांची सामाजिक व राजकीय कार्याचा विचार करत व संघटनात्मक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेले युवा नेतृत्व म्हणून रवींद्र गायके पाटील यांची खासदार लंके यांच्या शिफारसीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली.
जिल्हा परिषद सुपा गटाच्या वतीने खासदार निलेश लंके यांचा खासदार झाल्यानंतर प्रथमच भव्य नागरी सत्काराचे आयोजन शनिवारी वाडेगव्हाण येथे करण्यात आले होते .सदर समयी त्यांना सन्मानित करत जिल्हा कार्यकारिणीवर पक्षाचे काम करण्याची संधी देत नियुक्तीपत्र देण्यात आले . खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष रामेश्वर निमसे यांच्या हस्ते देण्यात आले.पारनेर तालुक्यातील सावरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाल्या नंतर समाजकारणात राजकारणात सक्रिय राहत गेल्या पंधरा वर्षांपासून सावरगाव ग्रामपंचायत सदस्य असलेले व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका उपाध्यक्ष म्हणून तर निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून काम करत असलेले रवींद्र गायखे यांना राष्ट्रवादी पक्षाने एकनिष्ठतेला पदाच्या माध्यमातून न्याय दिला असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. खासदार निलेश लंके यांनी त्यांचे अभिनंदन केरत निवडीचे पत्र दिले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे सभापती पारनेर बाजार समिती बाबाजी तरटे ,निलेश लंके प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदामराव पवार निलेश लंके प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष कारभारी पोटघन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व जिल्हा परिषद सुपा गटातील ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे भाग्य मिळते पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन काम करणारे शरदचंद्र पवार साहेब हे खऱ्या अर्थाने आमच्या युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. ही प्रेरणा घेऊन खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात जिल्ह्यात काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार व कार्य जिल्ह्याच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्वतोपरी युवकांची मोठी फळी उभी करण्यासाठी काम करणार !
श्री.रवींद्र गायखे पाटील
(नवनिर्वाचित जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत