पारनेर(वेबटीम) पारनेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाची पारनेर तालुका नवनिर्वाचीत कार्यकारणीची नव्याने फेर निवड जाहीर करण्यात आली....
पारनेर(वेबटीम)
पारनेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाची पारनेर तालुका नवनिर्वाचीत कार्यकारणीची नव्याने फेर निवड जाहीर करण्यात आली. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ( A) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीता चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशी दारोळे,, अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख रोहीत आव्हाड, बंडू आव्हाड या वरिष्ठांचे आदेशाने पारनेर तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.या मध्ये पारनेर तालुका महिला अध्यक्षपदी माही सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्षपदी आरती रमेश सोनवणे, तालुका कार्याध्यक्षपदी सचिन अल्हाट, पारनेर शहराध्यक्षपदी सीमा प्रधान यांची सर्वानुमते निवड जाहीर करून त्यांना जिल्हाध्यक्ष प्रदिप मकासरे यांचे हस्ते आंबेडकर पक्षाचे अधिकृत निवड पत्र देण्यात आले.
पारनेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आंबेडकर पक्षाची तालुकास्तरीय बैठक पारनेर शहरातील तक्षशिला बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचा वर्धापनदिन व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यासाठी पूर्व तयारी म्हणुन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पारनेर तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची अधिकृत निवड करण्यात आली. या बैठकीसाठी अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख रोहीत आव्हाड, जिल्हाध्यक्ष प्रदिप मकासरे, उत्तर अहमदनगर युवक अध्यक्ष रॉकी लोंढे, अहमदनगर शहराध्यक्ष हरीश अल्हाट, पारनेर तालुकाध्यक्ष किरण सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष प्रदिप मोरे, शहराध्यक्ष निखिल गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठक यशस्वीतेसाठी ॲड. मोनिका सोनवणे, मृणाली सुर्यवंशी, प्रतीक्षा मोरे, अनिता रोकडे, लता सुर्यवंशी, गणेश सोनवणे, अक्षय जाधव, सुनिल चौधरी, स्मितम राक्षे, रमेश सोनवणे, राजेंद्र जेकटे, दीपराज सोनावणे, यशवंत रोकडे, आदींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत