राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड रोडनजीक असलेल्या मृणाल झेरॉक्स व मनी ट्रान्सफर सुविधा केंद्र फोडून अज्ञात चोरट्यांन...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड रोडनजीक असलेल्या मृणाल झेरॉक्स व मनी ट्रान्सफर सुविधा केंद्र फोडून अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे नुकसान करत किरकोळ रक्कम लंपास केल्याची घटना आज ११ जुलै रोजी पहाटे ३ च्या दरम्यान घडली आहे.
नगर मनमाड मार्गावर अशोक एजन्सी समोर सचिन साळवे यांचे मृणाल झेरॉक्स व मनी ट्रान्सपर सुविधा दुकान असून पहाटे २ ते ३ चोरट्यांनी या ठिकाणी येऊन सीसीटीव्ही कॅमेरा व बाहेरील लाईट ट्यूब फोडून दुकानाचा पत्रा उचकटून आतमध्ये प्रवेश करून काही रक्कम नेऊन नुकसान केले आहे.
घटनास्थळी पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी दाखल होऊन पंचनामा केला आहे. तर अन्य एका ठिकाणावरून मालवाहतूक वाहनातील टाकीतून ५० लिटर डिझेल काढून ते लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत