देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष पदी अकील पटेल तर रफीक शेख कोअर कमेटीचे अध्यक्ष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष पदी अकील पटेल तर रफीक शेख कोअर कमेटीचे अध्यक्ष

देवळाली प्रवरा (वार्ताहर)  येथील  मुस्लिम पंच कमेटीचे अध्यक्षपदी अकिल(बाबा) बेगूभाई पटेल यांची तर पत्रकार रफीक नुरमहंमद शेख  यांची कोअर कमेट...

देवळाली प्रवरा (वार्ताहर)



 येथील  मुस्लिम पंच कमेटीचे अध्यक्षपदी अकिल(बाबा) बेगूभाई पटेल यांची तर पत्रकार रफीक नुरमहंमद शेख  यांची कोअर कमेटी च्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.


     पुढील पाच वर्षा साठी निवडण्यात आलेल्या मुस्लिम पंच कमेटीचे उपाध्यक्ष आसिफ शहामद शेख व मोहसीन गणीभाई शेख,सचिव मुस्ताक कमरुद्दीन शेख, सह सचिव शोएब राजू शेख तर जनसंपर्क अधिकारी म्हणून अफसर अन्सार शेख व इंजि. अजहर इब्राहीम शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

     कोअर कमेटी उपाध्यक्ष पदी अजीजभाई चंदूलाल शेख तर सदस्य म्हणून मुसा कादर शेख, प्रा.हाजी बशीर,प्रा.आरफान शेख ,उमरबेग इनामदार, माजी अध्यक्ष शकील शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 


देवळाली प्रवरा शहरातील मुस्लिम समाजाचे अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न अग्र क्रमकाने सोडवण्यासाठी नूतन कमेटी प्रयत्न करणार असून देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक बांधिलकी,व सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य नूतन कमेटीचे माध्यमातून करणार असल्याची प्रतिक्रिया पंच कमेटीचे नूतन अध्यक्ष अकिलबाबा पटेल यांनी यावेळी दिली. नूतन पदाधिकाऱ्यांचे विविध व्यक्ती,व संस्था कडून सत्कार करण्यात आला.   नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत