लोकसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढण्यासाठी देवळाली नगरपरिषद आयोजित स्पर्धेत वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान प्रथम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढण्यासाठी देवळाली नगरपरिषद आयोजित स्पर्धेत वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान प्रथम

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक -२०२४ मध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे या हेतूने आयोजित स्पर्धेत...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने लोकसभा निवडणूक -२०२४ मध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे या हेतूने आयोजित स्पर्धेत राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने प्रथम क्रमांक पटकाविला आहे

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्यावतीने शहरस्तरावर लोकसभा निवडणूकित जास्तीत जास्त मतदान व्हावे या  हेतूने सेल्फी विथ वोट, परिसरातील सार्वजनिक संस्था,रहिवाशी कॉलनी,बचत गट स्तरावर भरविण्यात आली होती.




  सेल्फी विथ वोट या गटात जवळपास ११० स्पर्धकांनी तर परीसरातील १२ सामाजिक संस्था,बचत गटांनी आपला सहभाग नोंदविला होता

  या स्पर्धेमध्ये सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने प्रथम क्रमांक पटकविला तर आझाद मित्र मंडळ यांनी द्वितीय व सोमेश्वर वसाहत,राहुरी फॅक्टरी यांनी तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

याचबरोबर लक्ष्मीआई महिला बचत गट, राजश्री शाहू महाराज पुरुष बचत गट व सोमेश्वर महिला बचत गटास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सेल्फी विथ वोट स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास नगरपरिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रांताधिकारी डॉ. किरण सावंत पाटील, मुख्याधिकारी विकास नवाळे,नानासाहेब टिक्कल,उदय इंगळे, कृष्णा महांकाळ,अजय कासार यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी वसंत कदम, अरुण पटारे,दत्तात्रय गागरे,राजू शेख,मनोज गावडे,अमोल वाळुंज,महेंद्र दोंड,धनंजय विटनोर,अनिल जाधव,बाबासाहेब खांदे,वैभव कदम, संतोष कदम,संदीप कदम, संतोष हारदे,कुणाल तनपुरे,सचिन साळवे,चंद्रकांत कपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.


  कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील गोसावी यांनी केले तर आभार अभिषेक सुतावणे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत