राहुरी(वेबटीम) आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी व शिंगणापूर या दोन देवस्थानला जोडल्या जाणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याचे काम अतीशय संथ गतीने व निकृ...
राहुरी(वेबटीम)
आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी व शिंगणापूर या दोन देवस्थानला जोडल्या जाणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याचे काम अतीशय संथ गतीने व निकृष्ट पद्धतीने सूरु असल्याने या निषेधार्थ उद्या गुरुवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता राहुरी येथे नगर-मनमाड मार्गावर राहुरी बाजार समिती समोर शिवसेना ठाकरे गटाच्या अहमदनगर उत्तर नगर जिल्ह्याच्यावतीने रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी दिली.
जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक या आंदोलनात सहभागी होणार आहे. नगर-मनमाड रस्त्यावर अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.अनेकांना अपंगत्व आले असून सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न बनला आहे.
तरी राहुरी तालुक्यातील जागरूक नागरिकांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत