समाजहिता बरोबर समाजिक सलोखा जपण्याचे काम करावे- शिवाजीराव कपाळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाजहिता बरोबर समाजिक सलोखा जपण्याचे काम करावे- शिवाजीराव कपाळे

राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) देवळाली प्रवरा येथील नूतन मुस्लिम पंच कमेटीने सामाजिक हिताची जपणूक करतानाच शहरातील समाजिक सलोखा जपण्यासाठी सुद्धा ...

राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)



देवळाली प्रवरा येथील नूतन मुस्लिम पंच कमेटीने सामाजिक हिताची जपणूक करतानाच शहरातील समाजिक सलोखा जपण्यासाठी सुद्धा काम करावे असे आवाहन साई आदर्श मल्टीस्टेटचे  संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.


        देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटी व कोअर कमेटी सदस्यांचा सन्मान साई आदर्श परिवाराच्या वतीने संस्थेच्या सभागृहात नुकताच पार पडला.


      यावेळी चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले की जगातील कोणत्याही धर्माची शिकवण वाईट नाही. प्रत्येकाने आपल्या धर्माचा अभिमान बाळगून इतर धर्माचा आदर करावा त्यामुळे सामाजिक सलोखा वाढीस लागून समाजात शान्तता नांदेल.देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमेटी व कोअर कमेटीला शहरातील अनेक वर्षांचा परंपरा असलेला सामाजिक सलोखा आणखी वाढीस लागण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहावे लागेल अशी अपेक्षा कपाळे यांनी व्यक्त केली.


       आदर्श पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विष्णूपंत गिते यांनी नूतन सदस्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कमेटीच्या कार्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


      कमेटीच्या वतीने कोअर कमेटी अध्यक्ष रफीक शेख यांनी मनोगत व्यक्त करून साई परिवाराचे आभार मानले. शहरातील सामाजिक सलोखा  कायम ठेवण्यासाठी साई आदर्श चे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे व साई परिवाराचे देखील मोठे योगदान असल्याचे त्यानी म्हटले.


   मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष अकिलबाबा पटेल,उपाध्यक्ष मोहसीन शेख, सचिव मुस्ताक शेख,कोअर कमेटी अध्यक्ष रफिक शेख, प्रेस फोटो ग्राफर बाळासाहेब मुसमाडे,मॅनेजर सचिन खडके,संचालक,अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत