राहुरी(वेबटीम):- विधानसभा निवडणुकीत राहुरीत शिवाजीराव कर्डिले व सत्यजित कदम असा वाद सुटत नसेल तर मी आहे असे सूचक वक्तव्य माजी खा.सुजय विखे य...
राहुरी(वेबटीम):-
विधानसभा निवडणुकीत राहुरीत शिवाजीराव कर्डिले व सत्यजित कदम असा वाद सुटत नसेल तर मी आहे असे सूचक वक्तव्य माजी खा.सुजय विखे यांनी केले आहे.
आज माजी खा.विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.ते म्हणाले की मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे.
श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सुचक वक्तव्य डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौ-यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या.
*व्हिडीओ*
राहुरीत शिवाजीराव कर्डिले आहेत, सत्यजित कदम देखील आहेत पेपरच्या माध्यमातून समजलं अन दोघांत जर वाद सुटत नसेल तर मी आहे असे सूचक वक्तव्य खा.सुजय विखे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत