श्रीरामपूर(वेबटीम) येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र या शाळेचा विद्यार्थी प्रज्वल गणेश पिंगळे या...
श्रीरामपूर(वेबटीम)
येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र या शाळेचा विद्यार्थी प्रज्वल गणेश पिंगळे याने विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. प्रज्वलने लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम, भारत टॅलेंट सर्च राज्यात तृतीय, महात्मा फुले प्रज्ञा शोध जिल्ह्यात दुसरा, मंथन परीक्षेत राज्यात १३ वा, एक्सलंट ऑलिम्पियाड राज्यात १० वा क्रमांक मिळवून आपल्या बुद्धीमत्तेची चुणूक दाखवली.
प्रज्वल पिंगळे यास शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, वर्गशिक्षक अमोल ईधाते, जालिंदर जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, पढेगाव केंद्रप्रमुख राजू इनामदार, विपुल गागरे, सागर माळी, पत्रकार संदिप पाळंदे आदींनी प्रज्वलच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत