परमगुरु शुक्राचार्य महाराजाची मूर्ती स्थापित करणे , हे ट्रस्टचे सर्वात मोठे महत्त्वाचे कार्य....... माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

परमगुरु शुक्राचार्य महाराजाची मूर्ती स्थापित करणे , हे ट्रस्टचे सर्वात मोठे महत्त्वाचे कार्य....... माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव(वेबटीम)    अतिशय पौराणिक महत्व असलेले संजीवनी मंत्राचे उगम स्थान , ज्यांच्या मुखातून मेलेला मनुष्य जिवंत होत होता असे सद्गुरु श्री श...

कोपरगाव(वेबटीम)




   अतिशय पौराणिक महत्व असलेले संजीवनी मंत्राचे उगम स्थान , ज्यांच्या मुखातून मेलेला मनुष्य जिवंत होत होता असे सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज यांच्या मंदिरात शुक्राचार्यांची मूर्ती बसवण्यात येत आहे. 

       या पौराणिक शुक्राचार्यांच्या मंदिरात शंकरभगवान यांचे शिवलिंग हजारो  वर्षांपूर्वीचे स्थापित आहे. शुक्राचार्य महाराजांची मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हती . त्या मूर्तीच्या स्थापनेत ज्यांनी पुढाकार घेतला असे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सचिव ॲड.संजीव कुलकर्णी ,खजिनदार ॲड.गजानन कोऱ्हाळकर , ट्रस्टी सुहास कुलकर्णी व हेमंत पटवर्धन या ट्रस्ट मंडळांनी तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे प्रमुख सचिन परदेशी , मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे ,  समितीचे सदस्य संजय वडांगळे ,राजेंद्र आव्हाड ,भागचंद रुईकर, बाळासाहेब गाडे ,मधुकर साखरे ,बाळासाहेब लकारे,  सुजित वरखेडे , विजयराव रोहन, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, विलास रंगनाथ आव्हाड ,अरुण जोशी, दिलीपराव सांगळे दत्तात्रय सावंत ,महेंद्र नाईकवाडे, विशाल राऊत, विकास शर्मा व व्यवस्थापक राजाराम पावरा यांनी पुढाकार घेऊन ही मूर्ती प्राणप्रतिष्ठित करायची संकल्पना करून ती पूर्णत्वाकडे नेली. निश्चितपणे या मूर्तीच्या विधिवत पाच दिवसाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधी नंतर या बेट भागाचा ,त्याचबरोबर कोपरगाव शहराचा निश्चित कायापालट होईल अशी सर्वांची भावना होती, ती पूर्णत्वा कडे जात आहे.





            मूर्ती बसल्यानंतर मोठ्या प्रमाणात जगभरातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी व पूजेसाठी वाढतील. वर्षभरात कधीही शुभविवाह करण्यासाठी या ठिकाणी मुहूर्त लागत नाही. मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापूर येथील शनीमंदिर , नेवासा येथील मोहिनीराज (राहू ग्रह मंदिर ) , साईबाबांच्या शिर्डी चे दर्शन करून ,जवळ असल्याने या स्थानाचे महत्त्व मोठे असल्याने शुक्र ग्रह यांची पूजा अभिषेक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी रोजच वाढत चाललेली आहे. शुक्राचार्य महाराजांच्या अंशातून शुक्र ग्रहाची निर्मिती झालेली आहे अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या स्थानाला अजूनही खूप महत्त्व आहे व इथून पुढे लोक अंमळनेरला मंगळ ग्रहाच्या पूजेसाठी दर्शनासाठी जातात. 

      मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची व गाभाऱ्यात सुशोभीकरण करत असताना या ठिकाणी गाभाऱ्यातून छोटासा कळसाच्या आतल्या बाजूला छोटी खिडकी सापडली आणि त्या आत मध्ये एक ध्यान रूम ,गुहा सारखी जागा म्हटले तरी चालेल. अशी पहिल्यांदाच सापडली व ती उघडली गेली. त्यामुळे हे बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे.

       या प्राणप्रतिष्ठेच्या पाच दिवसाच्या पूजेपैकी एक दिवस आम्हाला ट्रस्ट मंडळाच्या वतीने यजमान म्हणून पूजेला बसायची संधी मिळाली , त्याबद्दल सर्व ट्रस्ट मंडळ व समिती मंडळाचे आम्ही आभारी आहोत व निश्चितपणे या भागाचे महत्व वाढण्यासाठी ज्या काही सुधारणा कराव्या लागतील त्यासाठी ट्रस्ट मंडळाच्या बरोबर आम्ही राहुन आमच्या परीने निश्चितपणे सहकार्य करू. जेणेकरून भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात येऊन आपल्या गावचे नाव जगभरात जाण्यासाठी व त्यानिमित्ताने वेगवेगळे व्यवसाय वाढीसाठी सुद्धा यातून उपयोग होणार आहे असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.

         या प्राणप्रतिष्ठेचे पौरोहित्य वैभव गुरु व त्यांचे सर्व सहकारी गुरु व मंदिराचे गुरु नरेंद्र जोशी यांनी केले.

        या गाभाऱ्यातील सुशुभीकरणाचा व इतर सर्व लाखो रुपयांचा मोठा खर्च नाशिकच्या एका भक्ताने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत