प्रहार जनशक्ती पक्षाचे काम कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वांसाठी जनहिताचे.........माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रहार जनशक्ती पक्षाचे काम कोपरगाव शहर व तालुक्यात सर्वांसाठी जनहिताचे.........माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव(वेबटीम)   महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब , कष...

कोपरगाव(वेबटीम)



  महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब , कष्टकरी जनता , शेतकरी राजा , अपंग व सर्व नागरिक माता-भगिनींसाठी आदर्शवत अस काम करणारे, कोपरगाव तालुक्यातील तरुण पदाधिकारी चांगल्या पद्धतीने नेत्यांला साजेशी असे काम जनतेसाठी झटून करत आहे, विशेष करून महिला व गोरगरीब अशिक्षित वर्गासाठी सरकारी योजनेसाठी व त्यांच्या मुलाबाळांचे शिक्षणासाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले त्यांना मिळून देण्याचे काम मोठ्या प्रमाणात हे सर्व करत आहे.ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी सत्कार केला. ते करत असलेल्या जनसेवेच्या कामाची माहिती घेतली.




                    यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय भाऊ शिंदे , प्रहार विद्यार्थी कोपरगाव तालुका अध्यक्ष आकाश काळे , तालुकाध्यक्ष संदीप भाऊ क्षीरसागर , महेश भाऊ वाणी , प्रहार सेवक सागर भाऊ अहिरे यांचा सत्कार केला. व पुढील काळाच्या त्यांच्या जनसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शहरातील नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी नेहमी प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना चांगल्या कामासाठी नेहमी पाठिंबा राहील असे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.



        यावेळी पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू हे महाराष्ट्रभर काम करत असताना देखील सुद्धा कार्यकर्त्यांचे फोन उचलतात, राज्यातील वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना वेळ देतात.त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन लावतात व परत कार्यकर्त्याला काम झाल्यास किंवा त्या ठिकाणी जाण्याचं सांगतात , व्यस्त असताना मेसेज नी रिप्लाय देतात .अशा या त्यांच्या नेत्याचं प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशंसा करत पक्षनेते प्रथम कार्यकर्त्यांना आपल्या घरचे काम पहिले आणि मग पक्षाचे काम असे सांगतात व यातील सर्व पदाधिकारी हे तरुण कष्टकरी आहेत.ते करत असलेल्या सर्व कामाची माहिती दिली. भविष्यात मोठ्या प्रमाणावर शहर व तालुक्यात संघटन वाढवून शाखा उघडणार असून जनसेवेचे व्रत चालू ठेवणार असे सर्व पक्षाचे सदस्य म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत