राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कृती समितीने नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राहुरी येथील मुळा नदीवर १सप्टेंब...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कृती समितीने नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राहुरी येथील मुळा नदीवर १सप्टेंबर पासून बेमुदत रास्ता रोको जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून उद्या बुधवार दिनांक २८ रोजी सकाळी ११वाजता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीस नगर मनमाड रस्ता दुरुस्ती समितीच्या सदस्यांनाही बोलविण्यात आले आहे. या बैठकीत महसूल मंत्री आंदोलकांना काय आश्वासित करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
गेल्या पाच वर्षापासून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती समिती नगर मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा करत आहे. सध्या नगर-मनमाड रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने कृती समितीने राहुरी फॅक्टरी येथे बैठक घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
आज आ.प्राजक्त तनपुरे, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम राजुभाऊ शेटे, देवेंद्र लांबे, दीपक त्रिभुवन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेऊन १ सप्टेंबरपासून राहुरीत होणाऱ्या आंदोलनाचे निवेदन दिले.
दरम्यान ' आवाज जनतेचा' वेबपोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार उद्या बुधवार सकाळी ११ ते १ या वेळेत अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपणार आहे. या बैठकीत ना.विखे आंदोलकांना काय आश्वासित करणार व कृती समिती आपली काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत