श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा यासाठी श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा यासाठी श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या साखळी उपोषणास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्यावतीने पाठींबा देण्यात आला.
१५ ऑगस्ट पासून श्रीरामपूर येथे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले व शिवप्रहारचे प्रमुख सूरज आगे यांच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू असून या उपोषणास समाजातील विविध स्तरातून पाठींबा मिळत आहे.
या उपोषणास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार थोरात, अध्यक्ष कैलास शिंदे, सचिव राजेंद्र मोरे, सुधीर पठारे, वैभव गायकवाड,अमोल निमसे ,संदिप खर्डे ,सोमनाथ भालेराव आदींसह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत