डी पॉल शाळेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डी पॉल शाळेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सन्मान

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) आपल्या देशात दर वर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



आपल्या देशात दर वर्षी २९ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकीतील दिग्गज खेळाडू आणि जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील  डी पॉल या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने  क्रीडा दिवस साजरा केला गेला. 

सदर प्रसंगी शाळेकडून शिवछत्रपती पुरस्कार विजेते  आप्पासाहेब ढूस, (पॅराग्ल्यायडर), व्हॉलीबॉल खेळातून नुकत्याच इनकम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये निवड झालेल्या सौ.विद्या शेळके (आढाव), शरीर सौष्ठव पटू श्री.सखाहारी बर्डे या विविध खेळातील मान्यवरांचा गौरव करून यथोचित सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी आप्पासाहेब ढूस,  विद्या शेळके (आढाव), शाळेचे प्राचार्य फा. सॅन्टो थॉमस यांनी विद्यार्थाना विविध खेळांच्या माध्यमातून कशा प्रकारे नव नवीन संधी उपलब्ध आहेत व त्याचा भविष्यात चांगली करियर घडविण्यासाठी कसा फायदा करून घेता येईल यावर मार्ग दर्शन केले, पालकांनी देखील विद्यार्थ्यांना 10/12 च्या शिक्षना नंतर नवं-नवीन मैदानी खेळ, साहसी क्रीडा प्रकार खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे अशी विनंती केली. 

तसेच शाळेच्या वतीने शाळेचे प्राचार्य फा. सॅन्टो थॉमस, उप.प्राचार्य फा.जेम्स यांनी सर्व खेळाडू मान्यवरांचे व डी पॉल शाळेत नव-नवीन क्रीडा प्रकार अतिशय कौशल्याने शिकवणारे शाळेतील क्रीडा शिक्षक श्री.तस्लिम सय्यद, श्री.प्रशांत लहारे, सौ.रोशन वाघमारे यांचा सत्कार व स्वागत केले.  

सदर प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सदर प्रसंगी इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार व विविध खेळांची माहिती देणारा देखावा सादर केला. कार्यक्रम यशस्वीते साठी इयत्ता ८ वी चे विद्यार्थी व वर्ग शिक्षक स्वाती आहेर, सरला गडधे, नंदा दिवे तसेच सोनाली सोनवणे, रुपाली खंडागळे, स्वाती सांगळे, प्रियांका खराबे, मयुरी मुसमाडे, दीपाली विजन, यमुना काकड, शबाना शेख, राजू कांबळे, आशिष शिरसाठ, आदिनाथ गायकवाड, निलेश तारडे, राजू साळवे, ऋषिकेश नवले आदी.चे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत