राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजीक मंगल कार्यालयाच्या पटांगणात आज सायंकाळी आयोजित दहीहंडी कार्य...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजीक मंगल कार्यालयाच्या पटांगणात आज सायंकाळी आयोजित दहीहंडी कार्यक्रमात उपस्थित काही तरुण व पुणे येथील राजगुरूनगर येथून आलेल्या दहीहंडी पथकात हाणामारी झाल्याची घटना घडली.या वादानंतर राजगुरूनगर येथील पथकाने आम्ही दहीहंडी फोडणार नाही असा पवित्रा घेतला.त्यानंतर आ.कानडे यांनी माईक हातात घेऊन दहीहंडी फोडण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उरकू घेण्यात आला.मात्र हा कार्यक्रम उरकल्यानंतर सदर तरुणांनी दहीहंडी पथकाच्या दिशेने दगडफेकही केल्याची माहिती समोर आली.या घटनेमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगल कार्यालयात दरवर्षीप्रमाणे एका प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आ.लहू कानडे व त्यांचे समर्थक तसेच अन्य पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.राजगुरूनगर येथील पथक दहीहंडी फोडण्यासाठी आले असता डिजेवर डान्स सुरू असताना दहीहंडी बघण्यासाठी आलेले तरुण व पथकातील गोविंदा यांच्यात धक्काबुकीं झाली. आणि काही क्षणात धक्काबुकीचे रुपांतर हाणामारीत झाले.यावेळी सर्वांची एकच पळापळ झाली.पोलिसांनी हाणामारीतील तरुणांना मैदानाबाहेर काढले. मात्र याचवेळी राजगुरुनगर(पुणे) येथील पथकाने आम्ही लांबून आलो, आम्हाला काय संरक्षण, आम्ही दहीहंडी फोडणार नाही असा पावित्रा घेतला.
यावेळी आ.लहू कानडे यांनी हातात माईक घेऊन दहीहंडी फोडण्याबाबत व सर्वांना शांतता राहण्याचे आवाहन केले.
त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी दहीहंडी फोडून शांतता बाळगण्याचे आवाहन केले.त्यानंतर ५ मिनिटात दहीहंडी फोडण्यात आली आणि उपस्थित नागरिकांची गर्दी ओसरली. याचवेळी हाणामारी करणाऱ्या तरुणांनी दगडे पुण्यातील पथकाच्या दिशेने फिरकवली. पुन्हा वाद होण्याची चिन्ह असताना पोलिसांची कुमक वाढविण्यात आली. त्यानंतर दहीहंडी पथकास योगा भवनात भोजन देण्यात आले.पोलीस प्रशासन पथकाचे भोजन होऊन त्यांना मार्गस्थ होईपर्यंत तळ ठोकून होते. याबाबत पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत