राहुरी/वेबटीम:- बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली...
राहुरी/वेबटीम:-
बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या निषेधार्थ राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दुपारी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,मुंबई जवळील बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान चिमुकलींचे चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्याची घटना घडली आहे सदर घटना 12 व 13 ऑगस्ट रोजी घडली असून लहान मुले शाळेत जात नसल्याने या गोष्टीचा छडा लागला पीडित बालकांच्या पालकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता त्यांचा 12 तास गुन्हा दाखल करून घेतला नाही ही घटना अतिशय दुखद आणि दुर्दैवी आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष सचिन म्हसे, विजय शिरसाठ, ओंकार खेवरे, गणेश खेवरे, अमित पटेल, राहुल चोथे, रमजान शेख ,कैलास कोहकडे, ,सचिन शिरसागर ,पोपट क्षीरसागर, नाना करमड ,रमेश खुळे, अशोक खेवरे, सुरज पोटे, संजय बाचकर आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत