राहुरी/वेबटीम:- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झालेल्या घटनेचा राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी क...
राहुरी/वेबटीम:-
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शिशु वर्गातील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झालेल्या घटनेचा राहुरी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना बुधवार दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे .
यावेळी तालुकाध्यक्ष शारदा खुळे, वैशाली तनपुरे ,इंदुमती आमटे, अश्विनी कोहकडे, परविन सय्यद, सविता खंडागळे, ज्योती वेताळ, संगीता धनवटे, अश्विनी कुमावत, संगीता आहेर, श्रद्धा तनपुरे, नंदा उंडे, वृषाली भुजडी, वृषाली तनपुरे आदी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत