चिंचविहिरे येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ, २७ ऑगस्टला सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चिंचविहिरे येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ, २७ ऑगस्टला सांगता

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील श्री.लक्ष्मीनारायण मंदिरात गेल्या ६८ वर्षांपासून परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील श्री.लक्ष्मीनारायण मंदिरात गेल्या ६८ वर्षांपासून परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास २० ऑगस्ट २०२४ पासून प्रारंभ झाला असून  मंगळवार २७ ऑगस्ट रोजी काल्याचे किर्तनाने सांगता होणार आहे.


 सप्ताह काळात काकडा भजन, विष्णूसहस्त्रनाम जप, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. २० ऑगस्ट रोजी प्रभाकर महाराज कावळे, २१ रोजी अनंत महाराज काळे, २२ रोजी दुर्गाप्रसाद महाराज तिडके, २३ रोजी अनिकेत महाराज बांगर, २४ रोजी उत्तम महाराज गाडे, २५ रोजी गोविंद महाराज नाईकवाडे, २६ रोजी अमोल महाराज बडाख तर २७ ऑगस्टला सकाळी १० ते १२ या वेळेत दीपक महाराज बादाडे यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे.


तरी या सप्ताहात भाविकांनी हरिनामाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचविहिरे येथील समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, भाविक भक्त व सप्ताह कमिटीने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत