राहुरी फॅक्टरी(वेबटीम) ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध कंपन्यांच्या सीएसार फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहो...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध कंपन्यांच्या सीएसार फंडाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे निस्वार्थी प्रामाणिक काम करणारे देवळाली प्रवरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप बाळासाहेब पंडित यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने राज्यस्तरीय युवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह येथे १८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान सोहळा कार्यक्रमात देवळाली प्रवराचे श्रावणी इंटरप्रायझेस व सामाजिक कार्यकर्ते संदीप पंडित यांना गौरविण्यात आले. आई, वडील, पत्नी व मुलांसमवेत संदीप पंडित यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे, प्रदेशाध्यक्ष रोहित पवार, संपर्क प्रमुख अमोल शेवाळे, राज्य संघटक गोविंद पवार, कायदेशीर सल्लागार ऍड.प्रवीण कडाळे, आदर्श सरपंच निलेश पावसे, राजेंद्र गिरी, अशोक ओव्होळ, संजय काळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत