राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील शाळकरी मुले,माता भगिनी व तरुण वर्ग यांच्या कला गुणांना वाव मिळावा,त्यांच्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील शाळकरी मुले,माता भगिनी व तरुण वर्ग यांच्या कला गुणांना वाव मिळावा,त्यांच्या मध्ये व्यासपीठावर जाऊन बोलण्याची कला अवगत व्हावी यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला आहे.
सप्ताहाच्या प्रत्येक रविवारी सकाळी 10 ते दु 12 वाजेपर्यंत विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता, रंगभूमी, नाट्यकला,मोटिव्हेशन,आत्मविश्वास,सूत्रसंचालन या विविध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या मध्ये स्टेज डेअरिंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी श्री राहुल ठाणगे,शिवचरित्रकार हसन सय्यद,कुणाल तनपुरे,धनंजय विटनोर यांनी मनोगत व्यक्त केले.
परिसरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी या मोफत शिबिरात अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे संस्थापक वसंत कदम यांनी केले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन श्री राहुल ठाणगे, शिवचरित्रकार हसन सय्यद,पत्रकार श्रीकांत जाधव, मनोज गावडे,धनंजय विटनोर,संजय वाणी,कुणाल तनपुरे,वसंत कदम,सुजित सिनारे, बाबासाहेब खांदे,महेंद्र दोंड,तुषार गोपाळे,संतोष कदम,मयूर कदम,हर्षद कदम,सोहम कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत कदम यांनी केले तर आभार मनोज गावडे यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत