राहुरी(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांत जिज्ञासा व आत्मविश्वास असला तर तो निश्चितच स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते तसेच अभ्यासातील सातत्य हे तितक...
राहुरी(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांत जिज्ञासा व आत्मविश्वास असला तर तो निश्चितच स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते तसेच अभ्यासातील सातत्य हे तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिर्डी संस्थांनचे माजी विश्वस्त व प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील डौले वस्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या टाकळीमिया येथील वैभव रमेश लांडगे व अहमदनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदी निवड झालेल्या ज्ञानदा अनिल ढगे यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.प्रसंगी सुरेश वाबळे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक डी. बी.जगताप होते. तर यावेळी माजी सरपंच साईनाथ कोळसे, ज्येष्ठ विधिज्ञ जगन्नाथ डौले, अतिरिक्त अभियोक्ता अँड.अनिल ढगे, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता अँड.संगीता ढगे,अँड.प्रसाद कोळसे,अँड.अनिल वाळके, अँड.अमोल डौले, राहुल दुधे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक रवींद्र डौले यांनी केले.
पुढे बोलताना सुरेश वाबळे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन उच्च पदावर आरूढ होत आहे, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
या वेळी सरपंच अरुणा ओहोळ, उपसरपंच रविंद्र उरहे, राजेंद्र कोळसे, बबनराव कोळसे, दिनकर उरहे, रामनाथ उरहे, गुहा सोसायटी चेअरमन डॉ. वाबळे, कानिफनाथ देवस्थानचे नंदकिशोर सौदागर, शरद कोळसे नाना चंद्रे , किसन उरहे, रमेश ठोंबरे, मारुती निमसे, भगवान उरहे आदींसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.वेणूनाथ लांबे यांनी केले तर आभार अँड.जगन्नाथ डौले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत