मुंबई(वेबटीम) मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा मध्ये २०२३-२४ दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करून एकूण ३०० आरोपी...
मुंबई(वेबटीम)
मुंबई येथील सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा मध्ये २०२३-२४ दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करून एकूण ३०० आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून एकूण ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून फिर्यादींना परत केल्याबद्दल तसेच उत्कृष्ट तपास करून १९८ गुन्हे शाबीत केल्याबद्दल मुंबई सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन आज भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे साहेब, मुंबई रेल्वे यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ यांना गौरविण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे मुंबई मंडळाचे, श्री. ऋषी कुमार शुक्ला साहेब, वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, , सीएसएमटी, मुंबई आदिंसह अधिकारी उपस्थित होते.
सतीश शिरसाठ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम केले असता अनेक गुन्ह्याचा तपास करून राहुरीकरांची वाहवा मिळविली होती. सामान्य जनता केंद्रस्थानी स्थानी मानून सतीश शिरसाठ यांनी राहुरीत आपली सेवा केली.त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.सध्या मुंबई सीएसएमटी रेल्वे पोलीस येथे ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत