श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पूजा हर्षद चव्हाण यांच्यावतीने...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील रहिवासी व भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पूजा हर्षद चव्हाण यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आज १५ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहरातील संजय नगर येथील कै.अ. दि. मुळे प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणेश वाटप करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यदिन आज देशभरात उत्साहात साजरा होत असताना भारतीय जनता पार्टी उत्तर नगर जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस पूजा चव्हाण यांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन पुरुषोत्तम मुळे, सचिव नंदिनी मुळे, भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा पुष्पलता हरदास,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शीतल घोगरे, सचिव वंदना पोखरणा-बोरा उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुमाळ मॅडम, देठे मॅडम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पूजा चव्हाण यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत