राहुरी फॅक्टरी येथे चातुर्मासनिमित्ताने कृष्णा कदम याच्या ९ दिवसाच्या उपवासाची सांगता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे चातुर्मासनिमित्ताने कृष्णा कदम याच्या ९ दिवसाच्या उपवासाची सांगता

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.सुधाकर कदम व माजी नगरसेविका सुजाता कदम यांचे सुपूत्र कृष्णा ...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा.सुधाकर कदम व माजी नगरसेविका सुजाता कदम यांचे सुपूत्र कृष्णा कदम यांनी चातुर्मासनिमित्ताने ९ दिवस  केवळ पाणी ग्रहण करून उपवास केले असून या उपवासाची सांगता करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपवास सांगता सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.


राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी(तनपुरे कॉलनी) परिसरात जैन साध्वी समीक्षणाजी मा.सा व रूपमश्री मा.सा.यांच्या सानिध्यात चातुर्मास सुरू असून यानिमित्ताने दररोज प्रवचन, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.सर्वधर्मीय बांधव या कार्यक्रमास हजेरी लावत आहे. 



कृष्णा सुधाकर कदम यांनी ९ दिवस अन्न ग्रहण न करता उपवास केले असता या उपवासाची सांगता संपन्न झाली.


यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुरलीधर कदम, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, प्रकाश संसारे, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले,  माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, संचालक रामभाऊ काळे,  माजी नगरसेवक अमोल कदम, भारत शेटे, आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, भारत शेटे, प्रहारचे आप्पासाहेब ढुस, श्रीगोंदा येथील अमोल पवार , पारसमल खिंवसरा  आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे स्वागत सुधाकर कदम व सुजाता कदम यांनी केले.प्रास्ताविक ललित चोरडिया यांनी केले. आभार राजेंद्र सोळुंकी यांनी मानले. यावेळी चातुर्मास कमिटीचे रवींद्र छाजेड, पारस चोरडिया, आशिष राका, शुभम सोळुंकी आदी उपस्थित होते.




कदम परिवाराच्यावतीने गोपाल कृष्ण गोशाळेतील वृद्ध गोमाता यांच्यासाठी  आर्थिक देणगी देण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत