देवळाली प्रवरातील पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील पठारे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा

राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील  आंबी स्टोअर येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट संचलित स्व.विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे ७८...

राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील  आंबी स्टोअर येथील अस्मिता रुरल डेव्हलपमेंट संचलित स्व.विठ्ठलराव पठारे पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे ७८ वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 प्रारंभी संस्थेचे संस्थापक भागवत पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सचिव ज्ञानेश्वर पठारे, मुख्याध्यापिका पल्लवी पठारे,  डॉ प्रमोद साळुंके आदिंसह पालक उपस्थित होते.


 यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायन,नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.असंख्य विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.मंथन परीक्षेत जिल्हा व केंद्र पातळीवर यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन सोनाली पुंडकर यांनी केले तर आभार सारिका बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रद्धा निद्रे, अंजली बेहळे, कविता पांडे, ज्योती चव्हाण, अनुराधा पवार, स्वाती जाधव, रोहिणी कोळसे, पूजा वंजारी, बी ए. विधाटे, दत्तात्रय पठारे आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत