पंचाळे येथील गंगागिर महाराज सप्ताहास साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांची भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पंचाळे येथील गंगागिर महाराज सप्ताहास साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांची भेट

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सुरू असलेल्या योगिराज  सद्गुरू गंगागिर महाराज १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज १५ ऑगस्...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सुरू असलेल्या योगिराज  सद्गुरू गंगागिर महाराज १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज १५ ऑगस्ट रोजी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी भेट देऊन महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेतले.



गेल्या ५ दिवसापासून पंचाळे(सिन्नर) येथे सद्गुरू गंगागिर महाराज अखंड हरिनाम सप्ताह सूरु असून दररोज लाखो भाविक दर्शन व आमटी भाकरी प्रसादाचा लाभ घेत आहे.


आज या सप्ताहास साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी भेट देऊन महंत रामगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी मधु महाराज, माजी आ.भाऊसाहेब चिकटगावर, जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, विष्णुपंत गिते,  रामभाऊ काळे,किशोर थोरात, बाळासाहेब तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत