राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमनबाई सावळेराम विटनोर यांच्या हत्येचा तपास योग्य व जलद गतीने पूर्ण करून आरोपीस कठोर शिक्ष...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील मांजरी येथील सुमनबाई सावळेराम विटनोर यांच्या हत्येचा तपास योग्य व जलद गतीने पूर्ण करून आरोपीस कठोर शिक्षा करावी या मागणीचे निवेदन आज २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. मांजरी येथील महिलांनी राहुरी पोलिसांना दिले आहे.
मांजरीतील महिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हंटले की,मौजे मांजरी, राहुरी येशील वृध्द महिला सुमनबाई सावळेराम विटनोर यांची दिनांक ११.०८.२०२४ रोजी सोने लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाली. त्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळून आरोपीला काही तासात अटक करण्यात यश मिळाले याचे सर्व श्रेय पोलिस खात्याचे आहे त्याबद्दल सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन, मात्र सदर घटनेमुळे मांजरी गावात व परिसरात प्रचंड दहशत पसरली असून महिला व मुली घरा बाहेर पडायला घाबरत आहेत.
या सर्वामध्ये आत्मविश्वास व निर्भयपणा येण्यासाठी या दुदैवी घटनेचा कसून तपास होणे अपेक्षित आहे. आरोपीला सुटायची कुठलीही संधी मिळू नये यासाठी आपण प्रयत्न करावेत ही अपेक्षा आहे. सदर घटना दुदैवी असून या घटनेच्या मुळापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. कोणी एक एकटा आरोपी हे कृत्य करु शकत नाही. त्यास कोणीतरी आणखी जोडीदार नक्कीच असलील, त्यामुळे सदर आरोपीस अजून कोणी कोणी सहकार्य केले ही क्रूरता करण्यासाठी त्याला कोणी कोणी मदत व मार्गदर्शन केले. त्या सर्वांना सह आरोपी करून मयत महिलेला न्याय मिळण्या साठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत