राहुरी(वेबटीम) राहुरी पोलिसांनी आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अचानक ‘दुचाकी तपासणी मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. शहरातील मल्हा...
राहुरी(वेबटीम)
राहुरी पोलिसांनी आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता अचानक ‘दुचाकी तपासणी मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. शहरातील मल्हारवाडी चौकात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थांबून दुचाकी वाहनांची तपासणी केली आहे. वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेट बसवून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंधकरण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
वाहन चोरी तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर लक्षात घेता अशा घटनांना प्रतिबंध करणे व त्यांचा शोध घेण्याच्या उद्देशाने राहुरी पोलिसांकडून ई-चलन कार्यप्रणाली अंतर्गत तयार केलेल्या नाकाबंदी अॅपद्वारे वाहन तपासणी हा उपक्रम राबविण्यात आला. शेकडो वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. विनानंबर प्लेट, लायन्स न बाळगणे, ट्रीपल शीट आदी शेकडो दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक चारुद्दत खोंडे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल सूरज गायकवाड, दीपक फुंदे, श्री.पालवे, श्री.कुटे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत