राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील कणगर, गणेगाव, गुहावल परिसरात गेल्या तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर, गणेगाव, गुहावल परिसरात गेल्या तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात मोठा संताप व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसापासून कणगर , गणेगाव, गुहा व चिंचविहिरे परिसरातील गावठाण व वाड्या वस्त्यावर विद्युत पुरवठा खंडित झाला आहे .हा विद्युत पुरवठा कोणत्या कारणाने खंडित झाला याची माहिती घेण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना संपर्क केला तर ते उडवा उडीचे उत्तर देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आता तर वायरमन कर्मचाऱ्यांनी आपले फोन स्विच ऑफ केले असल्यामुळे ग्रामस्थांतून आणखी संताप व्यक्त होत आहे .तीन दिवसापासून सुरू असलेला खंडित असलेल्या विद्युत पुरवठा कधीही सुरळीत होणार हाच प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा राहिलेला आहे या प्रश्न ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत