राहुरी फॅक्टरी राहुरी तालुका क्रीडा स्पर्धा दि. १९ व २० रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमियाँ येथे पार पडल्या या स्पर्धे मध्ये राहुरी ता...
राहुरी फॅक्टरी
राहुरी तालुका क्रीडा स्पर्धा दि. १९ व २० रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय टाकळीमियाँ येथे पार पडल्या या स्पर्धे मध्ये राहुरी तालुक्यातून विविध शाळेंनी सहभाग नोंदवला होता. सदरच्या क्रीड़ा स्पर्धामधे वय वर्ष १४,१७,१९ मुले व मुली यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धे मध्ये डि पॉल शाळेतील १४ वर्षा खालील मुले व मुली आणि १७ वर्षा खालील मुले व मुली अशा चारही संघानी प्रथम क्रमांक मिळवला.
त्या बद्दल शाळेचे प्राचार्य फा.सॅन्टो व्ही.सी, उप.प्राचार्य. फा.जेम्स व्ही.सी, सिस्टर रुबी, शिक्षक व पालक आदींनी कौतुक केले. विजयी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक तस्लिम सर ,रोशन मॅडम, लहारे सर यांचे मार्ग दर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत