राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील गुहा येथे झालेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून दोषींवर ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथे झालेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून दोषींवर कठोर करवाई करावी या मागणी साठी गुहा येथील सागर सोनवणे यांचे गेल्या ४ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु असून शासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी सोनवणे यांच्यावतीने करण्यात आली आहे.
या संबंधी सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील इ मेल द्वारे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उपोषणास आजचा चौथा दिवस असून प्रशासनाकडून याची दखल घेतली गेलेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत