राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने सन्मान करण्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला.
राहुरी तालुक्यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात महत्वपूर्ण अशा सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या निवेदकांनी असोसिएशन स्थापन करून कार्यकारीणी जाहीर केली असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आदर्श नागरी पतसंस्थेत संस्थेचे मार्गदर्शक व विद्यमान संचालक अण्णासाहेब चोथे, चेअरमन प्रा.सुधाकर कदम, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय मोरे तसेच अँकर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब तनपुरे, उपाध्यक्ष गणेश हापसे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे, सल्लागार राजेश मंचरे, संघटक राजेंद्र कोतकर, खजिनदार साईनाथ कदम, सहसंघटक निखिल कराळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत