देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विजय त्रिंबक कदम यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने श्री.विजय त...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील विजय त्रिंबक कदम यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने श्री.विजय त्रिंबक कदम यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली.
मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत नेतनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कदम यांनी फार्मास्युटिकली बायोएक्टिव्ह हेटरोसायक्लिक संयुगे यांचे संश्लेषण आणि वैशिष्ट्य आणि त्यांची जैविक तपासणी यावर संशोधन केले. कदम यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्समध्ये संशोधन निबंधही प्रकाशित आहेत.
या यशाबद्दल डॉ.मझहर फारुकी, डॉ.आरिफ पठाण, डॉ.दिनेश लिगामपल्ले, डॉ.देवेंद्र वगारे यांनी त्यांचे अभिनंदन केले.पीएचडी प्राप्त विजय कदम हे राहुरी फॅक्टरी येथील कै. सुदाम गुंजाळ व कै. भारत गुंजाळ यांचे जावई आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत