राहुरीत मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास राहुरी न्यायालयाचा निकाल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना प्रत्येकी ३ वर्ष सश्रम कारावास राहुरी न्यायालयाचा निकाल

  राहुरी(वेबटीम) राहुरी शहरामध्ये गोकुळ कॉलनी येथे मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील दोन आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाध...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी शहरामध्ये गोकुळ कॉलनी येथे मोबाईल दुकान फोडून चोरी करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील दोन आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब कोर्ट नंबर 3 श्री मयूरसिंह गौतम यांनी दिनांक 04/09/2024 रोजी भारतीय दंड संहिता कलम 457  कलमाखाली अपराध केले बाबत दोषी धरून त्यांना प्रत्येकी 3वर्ष सस्रम कारावासाची व प्रत्येकी 5000 दंड व कलम 380 नुसार 3 वर्षे सस्रम कारावासाची व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली व त्यांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना पंधरा दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.




याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 24/02/2024 रोजीचे रात्री 08/15 ते दिनांक 25/02/ 2024 रोजी चे सकाळी 10/00 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी ऐश्वर्या अभिजीत खाडे राहणार गोकुळ कॉलनी राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांच्या मालकीचे गोकुळ कॉलनी येथील श्री गणेश मोबाईल शॉपी या मोबाईल दुकानाचे छताचे पत्रे उचकटून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून त्यांचे दुकानातील वर नमूद केल्याप्रमाणे मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता त्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 202/2024 भादवि कलम 457 380 प्रमाणे दिनांक 25/02/2024 रोजी दाखल करण्यात आला होता. घटना ठिकाणी मिळालेल्या आरोपीच्या फिंगरप्रिंट वरून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1) दिलीप रुमाल सिंग जाधव व 24 वर्ष राहणार नवालपुरा तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश (2) अनिल छत्तरसिंग डावर वय 26 वर्षे राहणार छोटा जुलवानिया तालुका सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांना राहुरी पोलिसांनी दिनांक 12/03/2024 रोजी नमूद होण्यात अटक केली होती. सदर आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला एकूण 82800/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये सॅमसंग कंपनीचा टॅब, पाच मोबाईल हँडसेट, एक स्मार्ट वॉच, सीसीटीव्ही कॅमेरा चा डीव्हीआर, इंटरनेट राउटर तसेच घरफोडी चोरी करण्यासाठी वापरलेले लोखंडी पाना, दोन कटवण्या, स्क्रू ड्रायव्हर, टॉर्च ,हेक्साब्लेड पक्कड, चाकू असे साहित्य जप्त केले होते. सदर गुन्ह्याचा पोलीस हवालदार वैराळ यांनी जलद गतीने व बारकाईने सखोल तपास करून आरोपीतांचे विरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून अटक आरोपींचे विरुद्ध *1 महिना 24 दिवसात* माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर आरोपी हे अटक केल्यापासून जेलमध्ये असून त्यांचेवर माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब कोर्ट नंबर तीन श्री. मयूर सिंह गौतम साहेब यांचे न्यायालयात अंडर ट्रायल खटला चालविण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.त्यामधे फिर्यादी, फिर्यादी चे पती, आरोपीचे निवेदन व जप्ती पंचनामाचे पंच, फिंगरप्रिंट ब्युरो अहमदनगर येथील महिला सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एम.डी.लेंगरे मॅडम व तपासी अंमलदार पोलीस हवालदार वैराळ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.सरकारीपक्षाच्या वतीने सदर खटल्याचे कामकाज    श्रीमती सविता गांधले - ठाणगे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या कामकाज पाहिले व त्यांना पोलीस कॉन्स्टेबल महेश शेळके व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत