राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- गणपती उत्सवाच्या निमित्ताने बालचिमुकल्यांमध्ये कलाकौशल्यात्मक मूल्यांची जोपासना करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील शिव...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
गणपती उत्सवाच्या निमित्ताने बालचिमुकल्यांमध्ये कलाकौशल्यात्मक मूल्यांची जोपासना करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून श्री गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाडूची माती उपलब्ध करण्यात आली.शिक्षकांकडून मातीचे गोळे करून विद्यार्थ्यांना देण्यात आली.श्सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणपती बाप्पा यांची मूर्ती तयार करून दाखवली.वेळोवेळी विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षमेतेने खूप छान -छान गणपतीच्या मूर्तीबनवल्या.मुख्याध्यापिका चोखर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत